मुंबई ( Mumbai ): काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर ( Maharastra State Announces New Covid-19 Regulations ) केली आहे. आज १ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली ( New Covid-19 Regulations) जाहीर केली. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र राज्यात आता सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल - तर लसीकरण अनिवार्य असेल. ओमायक्रॉनची ( Omicron ) लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला.
त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.
अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.
- ● एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु.
- ● स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु.
- ● हॉटेल, थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार.
- ● सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु.
- ● लग्नासाठी 200 जणांना परवानगी.
- ● अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली.
- ● सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी.
- ● सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी.
- ● पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार.
- ● ऑनलाईन तिकीट बुकिंग होणार.
- ● स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार.
- ● अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार.
- ● वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार.
- ● सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा 50 उपस्थितीत टक्के सुरु करण्याची परवानगी.
- ● रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थितीत सुरू.
- ● भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार.
- ● लग्न समारंभ 25 टक्के लोकांच्या उपस्थितीत हॉल सुरु.
- ● खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती.
- ● नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5.