HSC Exams 2022: 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल! नवीन तारीख जाणून घ्या - Batmi Express

HSC Exams 2022,HSC Board,HSC Board Exam,HSC Board Exam 2022,HSC 2022 News,Education,Exam,

HSC Exams 2022,HSC Board,HSC Board Exam,HSC Board Exam 2022,HSC 2022 News,Education,Exam,
12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

HSC Exams 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची अतिशय महत्वाची मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

  • 5 आणि 7 मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 आणि 7 एप्रिलला आता या विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून आली आहे.
  • 5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर 7 मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, पण हे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. “

“जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदीसह इतर २५ भाषांच्या प्रश्नपत्रिका”

“जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदी आणि इतर २५ प्रकारच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. रशियन, फ्रेंच, जापनीज, उर्दू, तेलगू, मल्याळम या विषयांचाही यात समावेश आहे. त्या प्रश्नपत्रिका ओपन झाल्या आहेत. त्यामुळे हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला तरी अन्य ८ विभागांनाही या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागत आहेत,” अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.

“वाहनाला आग लागल्याने अडीच लाख प्रश्नपत्रिका जळून खाक”

“आता या प्रश्नपत्रिकांवर पुन्हा काम करून, त्या पुन्हा छापून वेगवेगळ्या विभागांना पाठवाव्या लागतील. त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या विषयांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. यानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. पुणे विभागाला एकूण १६ लाख प्रश्नपत्रिका लागतात. त्यापैकी अडीच लाख प्रश्नपत्रिकांना आग लागली होती,” असंही शरद गोसावी यांनी नमूद केलं.

काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे.  येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे.

२ टिप्पण्या

  1. Unknown
    1. Be
      Be
      कृपया निजी जाणकारी कधीहि कंमेंट्स करू नका - आपण व्हाट्सअँप सपोर्ट सविस्तर माहिती घेऊ शकता.

      टीम
      बातमी एक्सप्रेस - पूजा राय
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.