वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
चंद्रपूर (Chandrapur ) :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरीक्षेत्रात सितारामपेठ येथील नमो संभा धांडे (५५) हा गुराखी आपली जनावरे चरण्यासाठी सराई रिसोर्टमागे दम बाजूला गेला होता.
हे देखील वाचा:
त्यावेळी वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढवित त्याच्या नरडीचा घोट घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. मृतकाचे कुटुंबियांना ३० हजारांची तातडीची मदत देण्यात आली असून गस्त वाढविण्यात आली आहे.