Chandrapur Covid Cases: जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यात 437 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 213 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर गुरुवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.( Chandrapur Covid Cases Today )
हे देखील वाचा:
|आत्महत्या | तुम्ही माझे लग्न गरीब घरात का केले ? असा प्रश्न विचारत नैराश्यग्रस्त मुलीची आत्महत्या, आत्महत्येचे कारण स्पष्ट
Chandrapur Covid Cases: आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 51, चंद्रपूर 17, बल्लारपूर 12, भद्रावती 22, ब्रह्मपुरी 17, नागभीड 5, सिंदेवाही 9, मुल 7, सावली 4, गोंडपिपरी 4, राजुरा 13, चिमूर 10,वरोरा 36, कोरपना 3 व जिवती येथे 3 रुग्ण आढळून आले असून पोंभूर्णा व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 77 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 94 हजार 774 झाली आहे. सध्या 1751 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 48 हजार 700 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 48 हजार 719 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1552 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन:- नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.