'
30 seconds remaining
Skip Ad >

CBSE Board Exam Updates | सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीची दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर | Batmi Express

0

CBSC  Exam,CBSE Board Exam Updates,CBSE Board Exam 2022, CBSE Board Updates,Education,Exam,Exam News,

CBSE Board Exam Updates | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे.  

सीबीएसईची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 घेण्यात आली. आता सीबीएसईच्या दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार आहे. 

कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट लवकरच जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021 ला कोरोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती.

दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे. सँपल पेपर गेल्या महिन्यात सीबीएसईची अ‍ॅकडेमिक वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे. डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंडळाने पहिल्यांदा 10 वी आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्याच आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×