'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! मित्राच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने २८ वर्षीय युवकाची आत्महत्या - Batmi Express

0

Suicide,suicide news,Aurangabad,Aurangabad Live,Aurangabad News,Aurangabad Suicide,Aurangabad Today,Aurangabad Marathi News,

औरंगाबाद ( Aurangabad News ) : औरंगाबाद जिल्ह्यात एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. मित्राचा मृत्यू झाला आणि तो धक्का सहन न झाल्याने थेट गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.  गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मित्राचे नाव चेतन दिलीप बनस्वाल असं आहे. तो अवघ्या २८ वर्षांचा होता. चेतनने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे.  ( 28-year-old commits suicide as friend dies )

मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं चेतन सतत म्हणत असे, अखेर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

चेतनचा मित्र हा अनेक दिवसांपासून आजारी होता. आजारपणामुळे चेतनच्या मित्राचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आपल्या जिवलग मित्राचा मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे चेतनने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत सदर घटना घडली आहे. मयत चेतन दिलीप बन्सवालने संगणकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले होते. चेतनच्या मित्राचा अवघ्या आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राचा आजारपणाने मृत्यू झाला होता. 

मित्राचा विरह चेतनला सहन होत नव्हता. मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं तो वारंवार बोलत होता. अखेर त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×