नागभिड: वीज खांबावर चढलेल्या तरूणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू; लोंबकळत राहिला मृतदेह - Batmi Express

Nagbhi,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi

Nagbhi,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi

खंडीत झालेला विद्युत पुरवठा सूरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या तरूणाचा विद्युत धक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यात घडली. रोषण पुंडलीक पाथोडे असे मृतकाचे नाव आहे.जवळपास अर्धा तास पुंडलीकचा देह खांबावारच लटकलेल्या स्थितीत होता.

प्राप्त माहितीनुसार नागभिड तालुक्यातील बोथली येथिल तरूण पुंडलीक पाथोडे हा विद्युत सबंधीत कामे करायचा. चिखलपरसोडी येथे एका घरातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा पुर्वरत करण्यासाठी पुंडलीक गेला होता.

मुख्य विद्युत लाईनचा पुरवठा खंडित न करता तो खांबावर चढला. दरम्यान जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का बसला. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. 

त्याचा देह लटकलेल्या स्थितीत खांबावरच होता. घटना लक्षात येताच गावकरी धावून आले. महावितरण ,पोलीस विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह खांबावरून उतरविण्यात आला.

दरम्यान उपचारासाठी पुंडलीकला नागभिड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दुदैवी घटनेने बोथली गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान पुढील तपास सूरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.