Chandrapur Crime: अन नेहमी दारू पिऊन येणारा शिक्षक अखेर निलंबित - Batmi Express

Be
0

Chandrapur Crime: अन नेहमी दारू पिऊन येणारा शिक्षक अखेर निलंबित - Batmi Express,Chandrapur News,Sawali News,Chandrapur Crime,Sawali,Chandrapur News IN

सावली (Sawali ):- तालुक्यातील उसरपार तुकूम येथील शिक्षक दिलीप ढोक हे शालेय वेळेत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याची पालकांची तक्रार व पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्या भेटीतही शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने संबंधित शिक्षकाची पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती.

शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिलीप ढोक यांना निलंबित केले आहे. उसरपार तुकुम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक दिलीप ढोक हे नेहमी दारू पिऊन येत असल्याने पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची दखल घेत सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी अचानक शाळेत भेट दिली मुख्याध्यापक दारू पिऊन आढळले.

शिक्षणासारख्या पवित्र कार्यात दारू पिऊन राहणे ही गंभीर बाब आहे. असाच प्रकार केशरवाही शाळेत चालत असून, येथील शिक्षक रजनीकांत गेडाम व कर्तव्यात कसूर करणाऱ्या इतर शिक्षकांचा प्रस्तावही जिल्हा परिषदेला पाठविला आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल. विजय कोरेवार सभापती पं. स. सावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->