पोंभूर्णा (Pombhurna ):- पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेक नवेगाव (रिठ)येथील एका तरुणाने मानसिक नैराश्यातून नदीकाठावर असलेल्या निंबोणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide ) केल्याची घटना आज दि. २ जानेवारीला उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव अमित अशोक खामणकर (वय २६ वर्ष) अस आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Young man commits suicide by strangulation )
(ads1)
Read Also:
चेक नवेगाव (रिठ) येथील सधन शेतकरी अशोक खामणकर यांचा मुलगा अमित हा शिक्षण घेत होता सोबतच आपल्या घरच्या शेतीतही हातभार लावायचा. मात्र काही दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन जळले होते.तो पुर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. व्यसनामुळे आई वडील त्याला दारू पिण्यापासून रोकायचे मात्र तो कुणाचेही ऐकत नव्हता. दि. १ जानेवारीला तो संध्याकाळी शेताकडे जातो म्हणून घरी सांगून गेला. मात्र रात्री उशीरापर्यंत घरी वापस न आल्याने घरच्यांनी इकडेतिकडे शोधाशोध केली मात्र तो रात्रभरात सापडला नाही. सकाळी तो अंधारी नदिच्या काठावर वेळवा शेतशिवारातील सर्व्हे नंबर ४६ मधील केशव आत्राम यांच्या शेतातील निंबोणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोंभूर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व बिट जमादार सुरेश बोरकुटे, राजकुमार चौधरी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले. घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहायक फौजदार संतोष येनगंदेवार, बिट जमादार सुरेश बोरकुटे करीत आहेत.