चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो आज ही प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर भरधाव कारने दहा जणांना उडवले ( Big Accident On Chinchani Beach ) असून यात हेतून खातू (६८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो आज ही प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने ९ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतून खातू या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.
खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ असणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे यावरून कारचा वेग किती असेल हे समजत आहे. इतर नऊ पर्यटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ६८ वर्षाच्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कार मध्ये असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले.
हे देखील वाचा:
|Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना एकजुटीने करूया : महापौर राखी संजय कंचर्लावार
या बीच वर दररोज कार व मोटरसायकलस्वार नेहमी वेगाने गाडी चालवत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चिंचणीकर करत आहेत मात्र अशा भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आता तरी अशांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
आणि…पत्रकाराने घेतला रुग्णवाहिकेचा ताबाअपघात घडल्यानंतर जखमींना चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बोईसरमध्ये पुढील उपचारासाठी हलवायचं होतं. मात्र रुग्णवाहिका असूनही चालकच नसल्याने पत्रकार प्रवीण बाबरे यांना रुग्णवाहिका चालवून बोईसर येथे ती आणली. तर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा मृतदेह चिंचणी येथे त्याच रुग्णवाहिकेतून आणावा लागला. दोन्ही वेळेस त्यांनी पत्रकार म्हणून बातमी संकलित करण्याचे काम न करता सामाजिक भावनेतून रुग्णांसाठी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद होती.