Chandrapur Corona Latest News: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर; आजचा आकडा धोकादायक - Batmi Express

Be
0

   Chandrapur,Chandrapur Corona,Chandrapur Corona Live,Chandrapur Corona Cases,Chandrapur News,Omicron News,Chandrapur Corona News,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,

Chandrapur Corona Latest News: कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या सहाशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 207 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 118, चंद्रपूर 18,बल्लारपूर 20, भद्रावती 30, ब्रह्मपुरी 4, नागभीड 4, सिंदेवाही 1, मुल 2, सावली 2, राजुरा 1, चिमूर 2, वरोरा 2, तर कोरपना येथे 3 रुग्ण आढळून आले असून  पोंभूर्णा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 89 हजार 629 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 401 झाली आहे. सध्या 683 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 13 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 22 हजार 101 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन:- नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->