चंद्रपूर: मागील 77 दिवसांपासून जिल्ह्यातील बससेवा (एसटी) ठप्प झालेली असतांना गुरुवार (13 जानेवारी)पासून 25 % सेवा सुरू होईल असा दावा चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक सचिन डबले यांनी केला आहे. दरम्यान शेकडो कामगार अजूनही दुखवट्यातच आहे. आता काही कामगार रा.प.मच्या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याने हळू हळू बसफेऱ्या सुरू होत आहेत. चंद्रपूर विभागातील 440 चालकांपैकी 13 चालक तर 380 वाहकांपैकी 24 वाहक कामावर रुजू झाले. बुधवारला 13 बस धावल्या.गुरुवारला आणखी 5 चालक रुजू होत असल्याने 25 % बससेवा सुरू करण्याची ग्वाही आगार व्यवस्थापक सचिन डबले यांनी दिली.
दुखवट्यातील एसटि कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभागातिल कर्मचारी मागील 77 दिवसापासून दुखवटयात आहे.दरम्यान राज्य परिवहन महामंडळातील 65 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी हे तणाव असून त्याची व त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता पूर्णपणे खालावली आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाच्या आत्महत्याग्रस्त 65 कुटुंबियांचे सांत्वन करण्याचे असल्याने कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकत नाही, आशा आशयाचे निवेदन एसटी कर्मचाऱ्यानीं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने,एसटी महामंडळ संभ्रमात सापडले आहे.
चालकाची तपासणी व चालक प्रशिक्षण पूर्ण न करता त्यांना बस फेरी काढण्याची अनुमती देणे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे आहे. विभाग नियंत्रक व विभागिय वाहतुक अधिकारी यांनी प्रवासशाच्या जीवाची पर्वा न करता नियमबाहयरित्या चालकाकडून फेरीपुर्ण करीत आहे. अशास्थितीत एखादि दुर्घटना घडली तर सदर विभाग नियंत्रक व विभागिय वाहतूक अधिकारी हे पूर्णपणे दोषी राहतील. विभाग नियंत्रक रा.प. चंद्रपूर व विभागिय वाहतुक अधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी कामगारांनी निवेदनातून केली आहे.