सावली ( Sawali ) :- चामोर्शी येथील सहकार नेते अतूल गण्यारपवार यांच्या गाडीची ट्रॅक्टरला धडक बसल्याने त्याचे चुलत भाऊ आनंद गण्यारवार जागीच ठार झाले. हा अपघात आज सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान ब्रम्हपूरी जवळ झाला.
हे देखील वाचा:
|ब्रम्हपुरी तालुक्यात रंगमोचन फाट्यावर कार व टॅक्टर चा भीषण अपघात; एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी
हि घटना ताजी असतानाच आज सकाळी 10 वाजता चा सुमारास टॅक्टर आठवडी बाजारा कडुन बस स्टॅंडकडे जात असताना यथार्थ भास्कर कल्सार वय वर्षे 5 हा धावत रस्ता ओलंडत असतांना टॅक्टर समोर आला. व त्याला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.