राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा उद्रेक; ५२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह - बातमी एक्स्प्रेस

राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा उद्रेक, Ahmednagar,Ahmednagar Live,Ahmednagar News,corona news,Ahmednagar Corona,Covid-19
राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा उद्रेक, Ahmednagar,Ahmednagar Live,Ahmednagar News,corona news,Ahmednagar Corona,Covid-19

गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. 
 (ads1)


गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं खळबळ उडाली होती.
  (ads1)

त्यानंतर या विद्यालयातील बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांत बाधितांची संख्या तब्बल ५२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात १९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली होती. 
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत ५ वी ते १२ वी पर्यंत वर्ग असून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, असेही अधिकाऱ्यांने सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.