'
30 seconds remaining
Skip Ad >

संतापजनक..! एकटं असल्याचा फायदा घेत गावगुंडांची प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण!

0

एकटं असल्याचा फायदा घेत गावगुंडांची प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण!,Jalgaon,Crime,Crime Latest News,crime news,

जळगाव
: चाळीसगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही गावगुंडांनी एका तरुण-तरुणीला अतिशय बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दहशत माजविण्यासाठी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. गावगुंडांनी पीडित तरुणाला अतिशय अमानुषपणे बांबूने मारहाण केली. तसेच तरुणीलाही बेदम मारहाण केली. संबंधित प्रकार हा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात झाल्याची माहिती समोर आली आहे.

 (ads1)

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुण-तरुणी हे प्रेमसंबंधात आहेत. ते कन्नड घाटात फिरत असताना गावगुंडांनी त्यांना घेरलं. यावेळी त्यांनी त्या जोडप्याची विचारपूस करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी दमादाटी केली. त्यानंतर या गावगुंडांनी जोडप्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करायला सुरुवात केली.  

 (ads1)

पीडित जोडपं एकटं असल्याचा फायदा घेत त्यांनी पीडित तरुण-तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यातही कैद केला. त्यानंतर सोशल मीडियात संबंधित व्हिडिओ शेअर केले. गावगुंडांनी तरुणाच्या डोक्यात फरशी घातली, विशेष म्हणजे गावगुंड एवढ्यावरच थांबले नाहीत. या गावगुंडांनी तरुणाचा मोबाईलही फोडला. हे गावगुंड संबंधित परिसरात वारंवार दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरु आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. पण अद्याप हवी तशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पीडित तरुणाने या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×