भंडारा 🟦: महामार्ग दिवसेंदिवस कर्दनकाळ ठरत आहे. रस्ता रुंदीकरणाअभावी शिंगोरी-फुलमोगरा या दरम्यान महामार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान शाळेत जात असलेल्या शिक्षिकेच्या स्कुटीला एका भरधाव ट्रेलर ने धडक दिली. त्यात स्कुटीरवार शिक्षिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
(ads1)
Read Also: भरलग्नात दोन मित्रांमध्ये लढाई; सपासप वार करत एकाची हत्या
रेखा बक्षिराम नागोरी (४५) रा. गुजराती कॉलनी भंडारा येथील रेखा नागोरी ही शिक्षिका रोजच्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता दरम्यान स्कूटी क्र. एम एच ३६ व्ही ३६३९ या गाडीने शाळेत जात असताना महामार्गावर कारघा पोलीस स्टेशन समोर भंडारा कडून लाखनीकडे जाणारा ट्रेलर क्र. एनएल ०१ एसी ९९७६ या भरधाव ट्रकने स्कुटीला जबर धडक दिली. या धडकेत स्कुटीस्वार शिक्षिका गंभिर जखमी झाली. जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची नोंद कारधा पोलिसात केली आहे.