Zilla Parishad Elections: भंडारासह गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बातमी | Batmi Express

Bhandara,Bhandara Zilla Parishad Elections,Batmya,Bhandara Live,Bhandara News,Gondia,gondia news,Gondia Marathi News,

Bhandara,Bhandara Zilla Parishad Elections,Batmya,Bhandara Live,Bhandara News,Gondia,gondia news,Gondia Marathi News,
 Zilla Parishad Elections - File Pic

Zilla Parishad Elections
: भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज येथे दिली. ( Zilla Parishad Elections )

आयुक्त मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. 

मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच  प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. 

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.