भुसावळ येथील 15 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन - File Pic |
Bhusawal ST Strike: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवरच एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तर या संपात भुसावळ आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत भुसावळ आगारातील पंधरा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ( Suspension of 15 ST employees at Bhusawal )
हे नक्कीच वाचा: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडलेले
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही कामगार सेवेमध्ये रूजू होणार नसल्याची प्रतिक्रियाही महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तर गेल्या आठ दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांसोबत राज्य सरकार बैठकांवर बैठका घेऊन कुठलाही निर्णय घेत नसल्याने आज कार्तिकी एकादशीनिमित्त आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विठ्ठलाला साकडेही घातले आहे.