गोगाव येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील गोगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केली असल्याची घटना नुकतीच घडली आहे. सोमाजी तुळशीराम भोयर वय वर्षे 70 असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून रा.गोगाव ता.ब्रम्हपुरी जी. चंद्रपूर येथील रहिवासी आहे. ( Isma commits suicide by hanging at Gogaon )
हे नक्कीच वाचा: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडलेले
सविस्तर वृत्त असे की मृतक सोमजी हा घरी कुणी नसल्याचा फायदा घेत राहत्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली आहे. मृतक इसमाच्या कुटुंबात दोन मुले,सून, दोन नातवंड आहेत. आत्महत्या करण्याचे कारण अध्यापही कळले नसून घटनेचा पुढील तपास संबधित पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.