Gondia Live : तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस गोंदिया

Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Marathi Batmya,Marathi News,Latest Marathi News,Gondia Live : तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू

Gondia,Latest Marathi News,gondia news,Gondia Marathi News,Marathi Batmya,Gondia Live News,Marathi News,
Gondia Live / 
गोंदिया:- दोन चिमुकल्या बहीण-भावांचा तलावात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोंदिया जिल्हाच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे बहीण-भाऊ खेळत होते. सायकलचे टायर खेळता-खेळता गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मागील तलावाकडे गेले. यावेळी ते तलावात पडले. दोघेही लहान असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ( gondia-live-sister-brother-dies-after-drowning-in-lake )

 गावात धान कापणीचे हंगाम सुरू आहे. घरातील सर्व मंडळी धान कापणीसाठी शेतावर गेले होते. आई-वडील दोन्ही शेतात होते. घरी आजोबा असताना मुले अंगणात खेळत होती. खेळता-खेळता दोन्ही चुलत बहीण-भाऊ गावालगत असलेल्या तलावाकडे गेले. सायकलच्या टायर खेळत होते. उतार भाग असल्यामुळे टायर सरळ तलावाच्या पाण्यात गेले. टायर काढण्यासाठी मुलगी पाण्यात गेली. तिच्या पाठोपाठ मुलगासुद्धा पाण्यात गेला. यावेळी दोन्ही मुले तलावाच्या पाण्यात बुडाली, अशी माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांनी दिली.


दोन्ही बालके घरी नसल्यामुळे कुटुंबातील लोकांनी इकडे-तिकडे विचारफूस केली. गावातील एका व्यक्तीने सांगितले की, ते तलावाकडे जाताना दिसले. त्यामुळे तलावाकडे जाऊन शोध घेण्यात आला असता, तलावात बालके खेळत असलेले टायर दिसले. त्यामुळे चिमुकल्यांची ओळख पटली. त्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. एकच परिवारातील दोन चिमुकल्यांचा मृत्यूमुळे दिवाळीच्या तोंडावर गावात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.