आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील वडधा नजीकच्या देलोडा खुर्द येथील गुराखी भीमदेव खेमाजी नागापुरे यांच्यावर वाघाने हल्ला करून जीवानिशी ठार केले. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ चालू आहे. अनेकांना वाघाच्या हल्ल्यात आपले जीव गमवावे लागले आहे. आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील गुराखी भीमदेव खेमाजी नागापुरे हे दिनांक 14 सप्टेंबर 2021 ला नेहमीप्रमाणे आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता, सायंकाळ झाली तरी गुरे घरी आली परंतु गुराखी घरी वापस आला नाही. एकंदरीत गुराखी बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांना कळले असता , गावकऱ्यांनी जंगलात जाऊन शोध घेतले असता गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला दिसून आला. गावकऱ्यांनी ही माहिती लगेच वन विभागाला दिली. ( tiger attack on gurakhi in deloda khurd )वनविभागाचे कर्मचारी येऊन प्रेताचा पंचनामा करण्यात आला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले . वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या गुराख्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
आरमोरी: देलोडा खुर्द मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #TigerAttack - BatmiExpress.com
मोरी: देलोडा खुर्द मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #TigerAttack,वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार , tiger attack on gurakhi in deloda khurd