धक्कादायक: झोपत असतानाच ६ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार |
पुणे : पुण्यातील वानवाडी सामूहिक बलात्काराचे प्रकरण धगधगत असताना आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुणे स्टेशन परिसरातून आणखी एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील ३९ वर्षांच्या रिक्षावाल्याने या मुलीचे अपहरण केले व तिच्यावर बलात्कार केला. या आरोपीला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला ही मुलगी आई शेजारी झोपलेली असताना या रिक्षावाल्याने मुलीला उचलून नेले. या मुलीचे वय ६ वर्षे असल्याचे समोर आले आहे. ( Rape of 6 year old Chimurdi while sleeping )
प्राप्त माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनपासून आईच्या शेजारी झोपलेली असताना रात्री साधारण १ वाजताच्या सुमारास या ६ वर्षांच्या मुलीला उचलून रिक्षात घालून मार्केटयार्ड परिसरामध्ये नेले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. थोड्या वेळाने आईच्या लक्षात आले की मुलगी शेजारी नाही. यानंतर ती समोर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात गेल्याचे दिसले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले आणि अटक केले. सध्या या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू आहेत.