'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परीसरात नेऊन सामूहिक अत्याचार | बातमी एक्सप्रेस लाखांदूर

0

14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परीसरात नेऊन सामूहिक अत्याचार,
14 वर्षीय अल्पवयीन सामूहिक अत्याचार

लाखांदूर:- भंडारा जिल्ह्यातून दुचाकीने स्थानिक लाखांदूरात येऊन एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परीसरात नेऊन सामूहिक अत्याचार केला. ही घटना गत 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचोली जंगल परीसरात घडली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी युवकांविरोधात अत्याचार गुन्ह्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

समीर आबाजी शहारे (22) व सुरज प्रभाकर मेश्राम (21) दोन्ही रा. मालडोंगरी(ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) अशी आरोपीची नावे आहेत. पोलीस सुञानुसार, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूरात आले. दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरुन जंगल परीसरात घेऊन गेले. यावेळी मुलीवर अत्याचार करण्यात आला. घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने सबंंधित अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली. सदर माहितीवरुन तब्बल दोन दिवसानंतर पिडीत अल्पवयीन मुलीसह कुटुंबियांनी गत 21 ऑगस्ट रोजी लाखांदूर पोलीसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन लाखांदूर पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु व लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×