![]() |
Schools Reopen: ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते सातवीच्या तर शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी शाळेची वाजणार घंटा |
हायलाइट्स:
- जिल्हा स्तरीय समितीचा निर्णय
- शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णयही ठरणार महत्वाचा
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण आणि आर टी पीसी आर बंधनकारक
Schools Reopen:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दर 0.01 टक्के खाली आल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील इयत्ता 5 वी ते 7 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास आज जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. येत्या 17 ऑगस्ट पासून या शाळा सुरू करण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक परिस्थिती आणि शाळेतील पटसंख्या आदी बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा आणि जिल्हास्तरीय समितीला अवगत करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.
आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात जिल्हा स्तरीय समितीची बैठक पार पडली. ( Schools Reopen )
शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावे. यासाठी शिक्षकांचे लसीकरण करून घेण्यात यावे, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिक्षक लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची 48 तास आधी आर टी पी सी आर चाचणी करून घेण्यात यावी, यासाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात यावी.
शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील पटसंख्या, कोरोनाची स्थानिक परिस्थिती आदी बाबींचा सूक्ष्मपणे विचार करूनच शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा आणि तसे जिल्हा स्तरीय समितीला कळवावे.
ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थ्यांना ने - आण करण्यासाठी महामंडळाच्या आणि शाळेच्या बसेस सुरू करण्यात याव्यात. बसेमध्ये शारीरिक अंतर पाळले जाईल याकडे लक्ष द्यावे. शाळेचे दररोज निर्जंतुकीकरण करणे आणि शाळेत विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. ( Schools Reopen )
शाळेत सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांशिवाय पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये.
शाळेत विद्यार्थी किंवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यापैकी कुणीही कोविड बाधित आढळल्यास शाळा बंद करण्यात यावी. संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे विलगिकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. या बैठकीला शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सोनवणे, माध्यमिक श्री घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले उपस्थित होते.