Nagbhid Crime News: गळा चिरुन नागभीडमध्ये विवाहित महिलेची हत्या | बातमी एक्सप्रेस नागभीड

Nagbhid Crime News,Murder of a married woman in Nagbhid by slitting her throat,Murder married woman

Nagbhid Crime News,Murder of a married woman in Nagbhid by slitting her throat,Murder married woman
Nagbhid Crime News: गळा चिरुन नागभीडमध्ये विवाहित महिलेची हत्या

Nagbhid Crime News:
 नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आई सोबत राहणाऱ्या विवाहित तरुणीचा प्रियकराने घरात घुसून हत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात घडली.. मृतक महिलेचे नाव पूजा रवींद्र सलामे (28) असून सदर महिलेचा लग्न चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकाशी झालेला होता मात्र त्याच्याशी मतभेद झाल्याने सदर युवती ही आपल्या आईकडे नागभीड ला राहत होती.. Murder of a married woman in Nagbhid by slitting her throat )

अश्यातच तिचे संबंध परसोडी येथीलच विवेक ब्रम्हदास चौधरी (25) याच्याशी जुळले होते... एक महिन्यापूर्वी काही कारणास्तव भांडण झाल्याचे सांगण्यात आहे.. मात्र आज सकाळी सदर विवेक ब्रम्हदास चौधरी (25) हा सकाळी पूजा ला भेटायला आला यावेळी पूजा ची आई बाहेर गेली होती.. आरोपीने पूजा च्या गळ्यावर सपासप धारधार शस्त्राने वार केल्याने पूजा चा जागीच मृत्यू झाला... 

दरम्यान आरोपी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये शरण गेला...पोलीस लागलीच घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासनी साठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे रवानगी करण्यात आली... सदर घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या नेतृत्वात  मडामे यांच्यात मार्गदर्शनात ए.पी.आय.कोरवते करीत आहेत..!!!

द्वारा बातमी: भोजराज नवघडे नागभीड 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.