'
30 seconds remaining
Skip Ad >

Astrology: आजचे राशिभविष्य; 5 जुलै 2021 - Today's horoscope; July 5, 2021 | बातमी एक्सप्रेस

0

  Astrology,राशिभविष्य,:आजचे राशिभविष्य;  राशिभविष्य 5 जुलै 2021

1. मेष : सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी.

2. वृषभ : आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. 

3. मिथुन : स्थिर विचार करावेत. कामात अतिघाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल.

4. कर्क : दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. 

5. सिंह : सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल.

6. कन्या : भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. 

7. तूळ : संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. 

8. वृश्चिक : नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

9. धनु : आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. 

10. मकर : वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. 

11. कुंभ : उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. 

12. मीन : गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×