हॉटेल मध्ये जेवणाच्या वादातून युवकाची हत्या |
Crime News: नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या नामांकित हॉटेल सोनाली मटण भाकरी या हॉटेल मध्ये एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. रात्री उशिरा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली घटना घडली आहे. हॉटेल मध्ये जेवणाच्या वादावरून खून झाल्याचं स्पष्ट झालं असून शेजारच्या टेबलावर बसलेल्या युवकांनीच प्रसाद भालेराव नामक 25 वर्षीय युवकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
25 वर्षीय युवकाची हत्या पोलीस आयुक्तल्याच्या इन्स्पेक्शन करण्यासाठी महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक कालपासून दौर्यावर असतांना खुनाची घटना घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचं सिद्ध झालंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पार्सल सेवा चालू ठेवण्याचे आदेश असतांना शहरात सर्वच हॉटेल मध्ये बसून जेवण्या साठी खवय्ये गर्दी करत असून पोलीस हॉटेल चालकांकडून चिरीमिरी घेऊन हॉटेल सुरुच ठेवण्यास अप्रत्यक्ष मदत करत असल्याचं समोर आले आहे.
हॉटेल मालकांना छुप्या पध्दतीने पोलीसांची आर्थिक सुरक्षा असल्यानेच नाशिक शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हॉटेल सुरू असल्याचं बोललं जातंय.