'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli News: राज्य शासनाद्वारे ग्रामपंचायतींना काढलेला परिपत्रक रद्द करावा | बातमी एक्सप्रेस

0

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,चामोर्शी

Gadchiroli News - चामोर्शी: 
ग्रामपंचायत च्या स्थापने पासून स्ट्रीट लाईटचे बिल राज्य शासन भरत आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून शासनाने स्वतः न भरता ग्रामपंचायत नी भरावीत असा फटवा काढलं, आणि 23 जून 2021 रोजी ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून, स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठा योजनेचा वीज बिल ग्राम पंचायतीने 15 व्या केंद्रिय वित्त आयोगाने दिलेल्या निधीतून भराव म्हणून जाहीर केले. हा राज्य शासनाचा निर्णय राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीस लागू येत असून याचे ग्राम पंचायत सोनापूर तालुका चामोर्शी च्या वतीने ग्राम पंचायत समोरील पाठांगणात सरपंच सौं. गोपिका टेकाम यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.

निषेधा म्हटले आहे कि, जर ग्रामपंचायत ने 15 वित्त आयोग मधून वीज बिल भरल्या गेला. तर नियोजित विविध घटकांनवर खर्च करता येणार नाही. तसेच ग्राम विकासाचे कोणतेही कामे करु शकत नाही. आणि म्हणूनच शासनाने 23 जून चा परिपत्रक रद्द करावा. आणि स्वतः राज्य सरकारने पूर्वी प्रमाणे स्ट्रीट लाईट वीज बिल भरावे, अशी मागणी ग्राम पंचायत कडून करण्यात येत आहे. यात श्री,शेषराव कोहळे उपसरपंच, श्री उंदीर उरवाडे सदस्य,श्री उत्तम कोवे सदस्य, श्री संदीप सोयाम सदस्य, सौ सविता कुणघाडकर सदस्य सौ कल्पना सिडाम सदस्य,सौ उषा चलाख सदस्या उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×