Gondia News: गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या | बातमी एक्सप्रेस

शेतकऱ्याची आत्महत्या, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या,शेतकऱ्याने आत्महत्या,Gondia,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,नवेगावबांध,

शेतकऱ्याची आत्महत्या, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या,शेतकऱ्याने आत्महत्या,Gondia,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,नवेगावबांध,
गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Img File - Loksatta

Gondia News:
नवेगावबांध अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव/येरंडी जंगल परिसरात झाडाला गळफास घेवून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (ता. ६) उघडकीस आली. यशवंत बारकू राऊत (५५) रा. देवलगाव/येरंडी असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

एरंडी येथील काही गुराखी जंगलात गुरे ढोरे चारावयाला गेले असता, दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान एरंडी देवलगाव येथील एक इसम झाडाला फाशी लागलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. याबाबतची माहिती गावात दिली. गावकऱ्यांनी सदर माहिती पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे दिली. घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान सदर शेतकन्यांनी आत्महत्या का केली ? हे कळू शकले नाही. पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशपाक शेख पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.