Chandrapur Corona: गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 18 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जुलै ०७, २०२१
0
Chandrapur New Corona Cases: आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 1, सिंदेवाही 0, मूल 1, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 5, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 768 वर पोहोचली आहे.
Chandrapur Corona Data: तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 61 झाली आहे. सध्या 175 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 72 हजार 839 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 85 हजार 9 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.