![]() |
Gondia News: येलोडी येथे वीज पडून इसमाचा मृत्यू |
Gondia News:
नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत येलोडी/जांभडी येथे वीज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ३० जून रोजीची आहे.
सुखराम मारोती कांबळे (५२) रा. येलोडी असे मृतकाचे नाव आहे. शेतात काम करीत असतांना सायंकाळच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात | झाली यात अंगावर वीज पडल्याने सुखराम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नवेगावबांध येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.