|
Chandrapur Vaccination |
Chandrapur Vaccination: विदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता शुक्रवार दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई.आय.सी इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे विशेष कोविड-19 (कोविशिल्ड) लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात एकही डोस न झालेल्या नागरिकांना पहिला डोस व पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येईल. सदर लसीकरण शिबिराचा लाभ 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता उपलब्ध आहे. (Chandrapur Vaccinationj )
हेही वाचा: Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
लसीकरण शिबिरास हे लाभार्थी असतील पात्र:
शिक्षणाकरिता विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीकरिता विदेशात जाणारे नागरिक तर टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक गेम करिता जाणारे खेळाडू व इतर आवश्यक निवड करण्यात आलेले कर्मचारी.
या दस्तऐवजाच्या आधारे लसीकरण करता येईल:
विदेशात ज्या संस्थेत दाखला झालेला आहे, त्याचे दस्तएेवज अथवा ज्या संस्थेसोबत नोंदणी होणार आहे त्या संस्थेबाबत झालेल्या व्यवहाराचा तपशील. जे विद्यार्थी यापूर्वीच विदेशात शिक्षण घेत आहेत, ते विद्यार्थी संस्थेने रुजू होण्याकरिता केलेल्या व्यवहाराची प्रत. नोकरी करिता विदेशात जाणाऱ्यांसाठी इंटरव्यू कॉल लेटर किंवा नोकरी भेटल्याचा पुरावा सादर करावा लागेल. ( Chandrapur Vaccination )
टोकियो ऑलिंपिक खेळाकरिता जाणाऱ्यांसाठी खेळा करिता नामनिर्देशित झाल्याचे दस्तऐवज सादर करावे लागतील. पासपोर्ट सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.