
तिरोडा: आजोबासोबत शेतकामासाठी शेतात गेलेल्या 9 वर्षीय चिमुकलीचा विज पडून मृत्यू झाला. घटना आज (ता. 19) दुपारी 3:30 वाजता सुमारास रामाटोला/काचेवानी शेतशिवारात घडली. सोनू जयराम शहारे (09) रा.रामाटोला/ काचेवानी असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे काचेवानी परिसरात एकच शोककळा पसरली.
सविस्तर असे की, सोनू जयराम शहारे ही चिमुकली आजोबासोबत जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेली होती. त्याचबरोबर शेतात आजोबा काम करीत असताना ती एका झाडाखाली उभी होती. दुपारी 3:30 वाजता सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान विज पडल्याने सोनू शहारे ही चिमुकली गंभीररित्या भाजली. घटनेनंतर लगेच तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे हलविण्यात आले.
मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनूला मृत घोषित केले. या घटनेमुळे काचेवानी परिसरात एकच शोककळा पसरली.