![]() |
Nagpur News: दुचाकी खांबाला धडकुन चालकाचा मुत्यु तर दोघे जखमी |
Nagpur News: पारशिवनी खापा या रोडवरील कोर्टा समोरअचानक दुचाकी रस्ता दुभाजकावरील लोंखडी खांबाला जोरधार धडक लागुन झालेल्या अपघातात चालकाचा मुत्यु झाला तर मागे स्वार दो़घे जण जख्मी झाले आहे.
सविस्तर माहिती याप्रमाणे: गुरूवार (दि.१७) जुन ला रात्री ८. ४५ वाजता दरम्यान तरूण रामभाऊ भिलकर वय २१ वर्ष रा. दहेगाव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र एम एच ४० सीबी ९८९३ ने सागर मुरलीधर राऊत व क्रिष्णा नान्हे असे टिबलसिट बसवुन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे जात असताना पारशिवनी खापा रोड वरील कोर्टा सामोर रोडच्या रस्ता दुभाजकावर असलेल्या लोंखडी खांबाला जाऊन धडक मारल्याने मागे बसलेल्या दोन्ही इसमांना जख्मी करण्यास व स्वत:च्या मरणास मुतक आरोपी दुचाकी चालक तरूण भिलकर कारणीभुत ठरला. सदर प्रकरणी फिर्यादी सागर राऊत वय २१ वर्ष रा दहेगाव यांचे फिर्यादी वरून पारशिवनी पोस्टे येथे आरोपी चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३०४(अ) भादंवि सहकलम १८४, १२८ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून पोलीस उपनिरिक्षक दिलीप बासोडे पुढील तपास करित आहे.