Gadchiroli Murder News: गडचिरोली जिल्ह्यातील फुले वार्ड मध्ये (२४ जून) आज सकाळच्या सुमारास इसमाची हत्या झाल्याची खबजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे कि, हत्या कोणी केली असावी असा प्रश्न नागिरकांत उपस्थित होत आहे. तर अज्ञात हत्याराचा शोध घेणे सुरूच आहे. दुर्योधन रायपूरे (अंदाजे ४९) रा. फुलेवार्ड क्रमांक ३ गडचिरोली असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुलेवार्ड क्रमांक ३ मध्ये वास्तव्यास होते. ते सामाजीक कार्यात सक्रीय होते. दररोज सामाजिक कार्य करणे त्यांचा नित्यक्रम होता. मात्र आज २४ जून रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला. त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. मात्र सदर हत्या कोणी केली असा याबाबत अदयाप कळू शकले नाही. अधिक तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.