Education News: राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन व विद्यार्थांचे आरोग्याकडे बघता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीची परीक्षा रद्द करताना अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, दहावीचा निकाल जुलै महिन्यात घोषित करण्यात येईल आणि अकरावीच्या प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती.
आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून १०वि नंतर अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
जुलै महिन्याच्या शेवट किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. म्हणजे जे जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही, त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.
जाणून घ्या CET प्रवेश परीक्षा कशी होणार याबाबत...
● CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेतली जाणार आहे.
● विद्यार्थ्यांना CET परीक्षा केंद्रांवर जाऊनच ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
● CET परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
● एकूण 100 मार्कांची ही CET परीक्षा असणार असून एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
● यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रश्न असणार आहे.
● CET परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.
● CET परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
● CET परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
● दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.