![]() |
आकापूर येथे वाघाच्या हल्लामध्ये गुराखी जागीच ठार |
तळोधी बा : येथून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या आकापूर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची खबळजनक घटना आज 19 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतक गुराख्या चे नाव खठू मानू कुंबले (65) असे आहे. सदर गुराखी नेहमी प्रमाणे आपली गुरे घेऊन जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. त्यातच दबा धरून बसलेल्या वाघाने कंपार्टमेंट न. 691 मध्ये गुराख्याला ठार केले.
वन परिक्षेत्राधिकारी धोंडणे यांच्या पथ काणे सदर मृतक गुराख्या च्या कुटुंबाला 20 हजाराची तातडीची मदत केली. मृतकाच्या शेव विच्छेदना साठी प्रेत नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.