'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: पूर परिस्थितीच्या अनुषंगाने एसडीआरएफची प्रशिक्षण कार्यशाळा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आयोजन

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News:
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थती लक्षात घेता नागरीकांचा बचाव व त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्यावतीने (एसडीआरएफ) प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले होते.

नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एसडीआरएफचे पोलिस उपअधिक्षक सुरेश कराळे, पोलिस उपनिरीक्षक अजय काळसरपे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री गव्हाड म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास 86 गावे पूरप्रवण क्षेत्रात असून पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभिर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. तसेच ज्या गावांमध्ये पूर परिस्थिती येण्याची शक्यता असते तेथील किमान 10-15 नागरिकांचे संपर्क क्रमांक जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

यावेळी एसडीआरएफचे उपअधिक्षक श्री. कराळे म्हणाले, पूर परिस्थितीत नागरीक घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांना धीर देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा. पूरपिडीत गावातील सरपंच, पोलिस पाटील व इतरही नागरिकांना सोबत घेऊन मदतकार्य सूरू करावे. जेणेकरून स्थानिक परिस्थितीची त्यांना चांगली कल्पना असल्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होणार नाही. संपर्क यंत्रणा मजबूत असणे गरजेचे आहे. एखाद्याने मदतीची याचना केली तर कोणताही विलंब न करता त्या परिस्थितीतून संबंधितांना बाहेर काढणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पूर परिस्थिती हाताळतांना मास्कचा वापर, सॅनिटायझर आदींचा उपयोग करावा. आपात्कालीन किटमध्ये टार्च, बॅटरीवर चालणारे वॉकीटॉकी, खाद्यसामुग्री, प्रथमोपचार किट आदी बाबी सोबत असाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्यासह पोलिस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काम करणा-या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×