Beed Crime News: एका विकृत मुलाकडून आई वडिलांना अमानुष मारहाण होत होती. काठी आणि दगडाने मारहाण होत असताना वृद्ध मदतीची याचना करीत होते. यावेळी त्यांना वाचविण्याऐवजी गावातील लोक मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. या अमानुष मारहाणीत अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर वडील गंभीर आहेत.
घटना शिरूर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे काल सायंकाळी घडलीय. त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रोगी असल्याचे समजते. काल सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहे. याप्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही. मारहाण होत असताना वृद्ध मदतीची याचना करीत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र लोकांनी मदतीऐवजी व्हिडिओ काढीत बसल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय.