Maharashtra Curfew Latest Update: राज्यात वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यात याआधी लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. तर, लग्न सोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तर 1 मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या पार्श्वभूमीवरच आता लग्न समारंभ व राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
विकेंड लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यात लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता फक्त 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. तर, कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.