Nagbhid News: संपूर्ण राज्यात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटे मुळे मोठ्या प्रमाणात रुगणांची संख्या वाढली असून प्रचंड प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. READ ALSO: हाफकिन संस्थेस लस उत्पादित करण्यास प्रशासनाकडून मान्यता !
एका अर्थाने राज्यावर आलेल्या संकटा समयी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आव्हान राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व्हेसर्वा आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबूबभाई शेख यांनी आव्हान केले होते. रक्तदाना संबंधाने केलेल्या आव्हाना नुसार आज दिनांक 15/4/2021रोजी नागभीड शहर येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात २७ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कार्यकर्त्यांना आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. Read Also: चंद्रपुरसाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे; आ. सुधीर मुनगंटीवार
सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा निरीक्षक आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब, ओ. बि. सी. सेल चे प्रदेश सरचिटणीस सुरेश रामगुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रा.यु.काँ. चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भाऊराव डांगे जी, रा.यु.काँ. नागभीड शहर अध्यक्ष शाहरुख शेख, रा.वि.काँ. जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख तालुका अध्यक्ष रियाजभाई शेख शहर अध्यक्ष हमजाभाई पठान सरचिटणीस संदीप डांगे, तालुकाध्यक्ष दिपक खोब्रागडे विद्यार्थीचे तालुका अध्यक्ष सिकंदर कास्तारवार शहर अध्यक्ष संदीप गेडाम सामाजिक न्याय शहर अध्यक्ष सुरेशभाऊ ढोले,सुरज बैस, वाजिदअली सय्यद, लियाकतअली सय्यद, विनोदभाऊ नायर, मारोती बंदीवार, रवि, शहाणे काकाजी,अखिलेश पाथोड़े, साहिल शेख, फारुख शेख इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम शेख व चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
CREDIT - SSheikh