एप्रिल १६, २०२१
0
Bhandara News: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डॉक्टर व नर्स अभावी कोवीड विभागात रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप कोरोना बाधीताच्या नातेवाइकानी केला.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागात डॉक्टर नर्स व परिचारिकांचा अभाव असल्याकारणाने कोरोना रुग्णांची गैरसोय होताना दिसून येत असल्याचे काहीसे चित्र एका व्हिडिओच्या माध्यमातून कोरोना बाधिताच्या नातेवाईकाने दाखवले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( व्हिडिओ दुवा लवकरच अद्यतनित केला. )
जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभार सुरू असल्याने जिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरमध्ये नर्स डॉक्टर यांच्या कमतरतेमुळे व उपायोजनांअभावी कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ योग्य ते नियोजन केले नाही, तर येत्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.