Gadchiroli Corona Updates:आज जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10924 वर पोहचली. तसेच सद्या 2168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 165 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
Gadchiroli Corona Deaths Updates: 8
आज आठ नवीन मृत्यूमध्ये सावरगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील 46 वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, तालुका ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील 61 वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील 86 वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.40 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.35 टक्के तर मृत्यू दर 1.24 टक्के झाला.