'
30 seconds remaining
Skip Ad >

Bramhapuri Live: वरिष्ठ अधिकारी घडविण्यासाठी ई-लायब्ररीचा उपयोग व्हावा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार | Batmi Express Marathi

0

Bramhapuri Live,Bramhapuri Live Today,Bramhapuri News,Chandrapur Live
गरपालीका, महसुल, सार्वजनिक बांधकाम व नगरवाचनालयाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Bramhapuri Live:
ब्रम्हपुरी येथील युवावर्गातून भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून त्यांचेकरिता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त अद्यावत व वातानुकूलित ई-ग्रंथालय बांधण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

$ads={1}

ब्रम्हपुरी येथील ई-लायब्ररी बांधकामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या ई-लायब्ररीचे बांधकामाची अंदाजीत किंमत 7 कोटी 56 लाख 44 हजार रुपये असून पुढील 8 ते 12 महिन्याच्या आत ही सुसज्ज इ-लायब्ररीची इमारत पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

Read Also:   Chandrapur College Close: शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद

जिवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपुर्ण कष्ट व सकारात्मक विचारप्रणाली आवश्यक असून शिक्षणाच्या बळावर देशासाठी व समाजासाठी मोठे कार्य येथील विद्यार्थ्यांच्या हातून घडावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

$ads={2}

पालकमंत्री यांनी याप्रसंगी तहसिल प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचीही पाहणी केली व इमारतीचे प्रवेशद्वार मोठे करण्याबाबत तसेच लिफ्ट व इतर बाबींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सांगितले. यावेळी नगरपालीका, महसुल, सार्वजनिक बांधकाम व नगरवाचनालयाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×