आरमोरी तालुक्यातील देलनवाडी या महामार्गावरील – वैरागड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खूपच दयनिय होत चालली आहे. लवकरात लवकर या रस्त्याची अवस्था बघून दुरूस्ती करून डांबरीकरण करण्यात यावी अशी मागणी शिवनी खुर्द येथील श्रीरंग कुमरे व भिमराव टेम्भुरने यांनी जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता आरमोरी यांच्याकडे आज केली आहे. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी महामार्गावर - वैरागड या रस्त्यावर बऱ्याच वर्षापासून भरपूर प्रमाणात वाहनांची वर्दळ चालूच असल्याने या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार प्रवास्यांना अपघाताची शक्यता निर्माण होत असते.
महामार्गाचे बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमी येणे-जाणे असते परंतु तो रस्ता त्यांना का दिसत नाही का?
मागील गेल्या चार ते पाच महिण्यापुर्वी प्रशानाकडून तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र आज ते खड्डे आठच दिवसांत उखडल्याने रस्त्याची परिस्थिती पुन्हा तशीच झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. Read Also: राज्यातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होणारच : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी महामार्गावर -मार्गावरून दररोज शेकडो वाहने कार,ट्रॅक्टर, बस असे अनेक वाहन वाहतूक करत असतात परिणामी रस्ता खराब असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक होत आहे. त्यामुळेच या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवणी खुर्द येथील श्रीरंग कुमरे व भिमराव टेंभुरणें यांनी केलीआहे .
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.