 |
घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने प्रदान करीत |
Ahmednagar News Live: घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक होते. सोबतच होते चिमुकल्याच्या सायकलची वाईट अवस्था. आपली लाडकी सायकलचा जळाल्याचे बघून निशब्द झालेल्या चिमुकल्याला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी समर्थ साद घाताली आहे.$ads={1}
Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार
अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवित असतानाच अचानक घरांना आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्या च्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला. आई - वडिल घराची राख झाल्याने हताश झाले असतानाच चिमुकला मात्र सांगाडा झालेल्या सायकलकडे निशब्द होऊन बघत बसला.
समाजमाध्यमांवर हे छायाचित्र झळकताच राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी त्या कूटूंबियांना संपूर्ण मदत करीत चिमुकल्याच्या भावनांना साद घातली व सायकल सुद्धा चिमुकल्यासाठी रवाना करीत औदार्याची भूमिका बजावली.
$ads={2}
प्रहारचे अहमदनगर येथील पदाधिकारी यांनी रविवारी (ता,4) तातडीने सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले. त्यांनी घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने प्रदान करीत कुटूंबियांना आणखी मदतीचा शब्द दिला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.