गडचिरोली : जिल्ह्यात सततधार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गडचिरोली ते आरमोरी या मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 93 वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
गडचिरोली येथील पाल नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीवरील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात सदर मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.या मार्गावरून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत तसेच नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस मोठा फटका बसला आहे.
स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.