कुरखेडा: तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू | Batmi Express

kurkheda,kurkheda live,Kurkheda News,Drowned,Gadchiroli Drowned,Drowned News,

 

kurkheda,kurkheda live,Kurkheda News,Drowned,Gadchiroli Drowned,Drowned News,

कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्याच्या कढोली गावालगत असलेल्या सती नदीत आपल्या ३ मित्रांसह आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवार दिनांक-१३ ऑगस्टच्या दुपारी ३ वाजताच्या सुमाराला घडली.त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.विकास ताराचंद सहारे वय २० वर्षे,रा.कढोली असे मृत तरुणाचे नाव आहे.

विकास हा काल,मंगळवारी कढोलीतील अमन निंबेकर,प्रज्योत सहारे,प्रणय सोनुले यांच्यासोबत गावालगत असलेल्या सती नदीत आंघोळीसाठी गेला होता.सध्या पाऊस थांबला असला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेलीच आहे.दरम्यान,चारही मित्र आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले.यावेळी मृत विकासला खोल पाण्याचा अंदाज आला नाही.मात्र, खोल पाण्यात गेल्याने विकास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.सहकारी मित्रांनी त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र,पोहता येत नसल्याने विकासचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच नागरिकांनी नदीपात्र गाठून विकासचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.घटनेनंतर काही वेळाने विकासचा मृतदेह नदीपात्रात दूरवरून बाहेर काढण्यात आला.या संदर्भात आरमोरी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.