Nagbhid Crime | मनोरुग्ण महिलेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या | Batmi Express

Nagbhid Crime,Nagbhid,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Molested,

Nagbhid Crime,Nagbhid,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Molested,

प्रतिनिधी / चंद्रपूर :
 चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे गेल्या १२ दिवसांपूर्वी एका मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याला पाच आरोपींना अटक करण्याची कारवाई काल दिनांक २२ ऑगस्ट ला करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर, काँग्रेसचे ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले काँग्रेसचे चिमूर यांनी काँग्रेसचे शिष्टमंडळासह नागभिड पोलीस स्टेशनला भेट देऊन उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. 

प्राप्त माहितीनुसार १२ ऑगस्ट ला नागभीड शहरातील एक मानसिक आजार ग्रस्त मनोरुग्ण महिला एकटी फिरत असल्याचे पाहून काही मनोविकृत इसमांनी त्या महिलेला रात्रपाळी बस स्थानक नागभीड येथील प्रसाधनगृहात या निर्जन स्थळी नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचार करतानाचा व्हिडिओ या आरोपींपैकी एकाने मोबाईल द्वारे शूट करून जतन केला. व काही दिवसानंतर हाच अश्लील व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवला असता संबंधित मित्राने सोशल मीडिया ग्रुप वर वायरल केल्याने घटनेतील मनोविकृत नराधमांचा हा अमाननीय प्रकार चव्हाट्यावर आला.

सदर घटनेची माहिती मिळताच प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार या आपला सिंदेवाही तालुका जनसंपर्क आटवून त्वरित आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या कार्यकर्त्यांसह नागभीड येथे येऊन पोलीस स्टेशन गाठले. व तेथे उपस्थित अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू व इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यात नुकत्याच घडलेल्या बदलापूर, अकोला जिल्ह्यातील घडलेल्या अमानुष घटनांच्या तसेच नागभीड येथे घडलेल्या अतिशय निंदनीय प्रकाराच्या पार्श्वभूमीवर विस्तृत चर्चा करून नागभीड येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पोलीस विभागाने सहकार्य करून सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे अशी मागणी केली. 

या प्रसंगी, काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुरकर, ओबीसी संघटक धनराज मुंगले, नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, महिला तालुका अध्यक्ष प्रणया गड्डमवार, सिंदेवाही तालुका अध्यक्षसीमा सहारे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सुचक, महिला शहराध्यक्ष प्रीती सागरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयश्री कावळे, पुष्पा सिडाम, माजी नगरसेवक प्रतिक भसीन,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष महेश कुर्जेकर, युवक कांग्रेस महासचिव अमोल वानखेडे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, सिंदेवाही अध्यक्ष अभिजीत मुपीडवार, गजानन उरकुडे, प्रशांत गेडाम, संकेत वारजुकर, संदीप सातव, भूपेश कोरे, पारस नांगरे, रूपाली रत्नावार, निमंत्रिका कोकोडे, प्रीती गुरणुले, रजनी काऊलकर,महेश मंडलवार, निकु भैसारे, रोशन वारजूरकर, अंकुश सिडाम व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.