ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :- ब्रम्हपुरी शहरात मागील दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे पहिल्यांदा वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून ब्रम्हपुरी तालुक्यातील नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सर्वत्र पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
ब्रम्हपुरी येथील भूतीनाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी वरून वडसाला ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र,पावसामुळे तो रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहनचलकांना ब्रम्हपुरी-कुर्झा-अर्हेरनवरगाव-पिंपळगाव-सोंदरी-सुरबोडी- वडसा असा मार्गक्रम करित प्रवास करावा लागत आहे. अर्हेरनवरगाव ते कुर्झा नाल्यावर मागील दोन दिवसांपासून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे.
ब्रम्हपुरी ला जाण्यासाठी पुन्हा एक मार्ग: जर सुरू असेलच तर प्रवास करांव - पुराच पानी असेल तर प्रवास टाळा.
ब्रम्हपुरी-कुर्झा-नांदगाव-अर्हेरनवरगाव-पिंपळगाव-सोंदरी-सुरबोडी- वडसा
सविस्तर मध्ये समजून घेऊया : काजल ला वडसा ला जायचं आहे. काजल जवळ तीन पर्याय आहेत.
पहिल पर्याय: ब्रम्हपुरी वरुण झिळबोडि वरुण नवेगाव आणि मग ब्रम्हपुरी - वडसा - महामार्ग मिळेल. (सध्या बंद - पुर कमी झाल की सुरू होईल - लक्ष घ्या फक्त दुचाकी वाहन)
दुसर म्हणजे ब्रम्हपुरी वरुण कुर्झा इथ सुद्धा काजल जवळ दोन ऑप्शन आहेत ते म्हणजे एक तर नांदगाव आणि दुसर अर्हेरनवरगाव. चला सविस्तर मध्ये जाणून घेऊया..
जेव्हा काजल ब्रम्हपुरी वरुण कुर्झा इथ पोहचली की तिला एक मंदिर दिसेल तोच मार्ग पकडून थोड समोर गेली की तिला डाव्या बाजूला नांदगाव हा मार्ग (ओळख : एक बोर्ड लावण्यात आल आहे ) तर सरळ मार्गावर अर्हेरनवरगाव आहे (ओळख : तुम्हाला एक पूल दिसेल ) .
दुसर पर्याय: जर काजल ने नांदगाव हा मार्ग निवडला तर काजल च प्रवास अस होईल बघा :
ब्रम्हपुरी - कुर्झा - नांदगाव - अर्हेरनवरगाव-पिंपळगाव-सोंदरी- सुरबोडी(ब्रम्हपुरी वडसा महामार्गवरील गांव) - वडसा
तिसर पर्याय: जर काजल ने अर्हेरनवरगाव हा मार्ग निवडला तर काजल च प्रवास अस होईल बघा :
ब्रम्हपुरी - कुर्झा - अर्हेरनवरगाव-पिंपळगाव-सोंदरी- सुरबोडी(ब्रम्हपुरी वडसा महामार्गवरील गांव) - वडसा
बातमी एक्सप्रेस सूचना :
- पुर परिस्थिति बघूनच प्रवास कराव. मार्ग बंद असेल तर प्रवास करू नका.
- बिनाकारण पुराच्या पाण्यातून प्रवास करू नका.
- शक्यतो बाहेर जाणे टाळा.
- पुर बघण्यासाठी गर्दी करू नका. शक्य असल्यास पुर दृश्य दुरूनच बघा.
- पुर बघत असताना मोबईलच काळजीपूर्वक वापर करा - उदा. सेल्फी काढू नका.